२१ ऑक्टोबर २०१८ निरुपण
अध्याय ६: ध्यानयोग (गीता श्लोक ३३-४३ / ज्ञानेश्वरी ओव्या ४१०-४५६)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्जुन उवाच ।
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥ ३३॥

चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४॥
तंव अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥ ४११ ॥
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें । एर्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥ ४१२ ॥
म्हणौनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल । कां राहा म्हणतलिया राहेल । महावातु ? ॥ ४१३ ॥
जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येसीं हातफळी । मिळऊनि जाय ॥ ४१४ ॥
जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥ ४१५ ॥
जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ? ॥ ४१६ ॥
म्हणौनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य होईल । हें विशेषेंही न घडेल । याचिलागीं ॥ ४१७ ॥
श्रीभगवानुवाच ।
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५॥

तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥ ४१८ ॥
परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥ ४१९ ॥
कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिलें गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ४२० ॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६॥
एर्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥ ४२१ ॥
परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥ ४२२ ॥
यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ? ॥ ४२३ ॥
म्हणौनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥ ४२४ ॥
तरी योगसाधन जितुकें । कें अवघेंचि काय लटिकें ? । परि आपणयां अभ्यासूं न ठाके । हेंचि म्हण ॥ ४२५ ॥
आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ? । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ? ॥ ४२६ ॥
तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥ ४२७ ॥
तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों । म्हणौनि मनातें जी म्हणों । अनावर ॥ ४२८ ॥
हा आतां अघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥ ४२९ ॥

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धि कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७॥

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ३८॥
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ३९॥
परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूं वांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥ ४३० ॥
म्हणौनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥ ४३१ ॥
इंद्रियग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटे लागला । आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ॥ ४३२ ॥
तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥ ४३३ ॥
जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ॥ ४३४ ॥
तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली । आणि अप्राप्तीही सांडवली । श्रद्धा तया ॥ ४३५ ॥
ऐसा दोंला अंतरला कां जी । जो श्रद्धेच्या समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ? ॥ ४३६ ॥

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥ ४०॥

तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावांचूनि अन्यथा । गती आहे गा ? ॥ ४३७ ॥
परि एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे । तेंही परी ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥ ४३८ ॥
एर्हवीं अभ्यासाचा उचलता । पाउलीं जरी चालता । तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिद्धीतें ॥ ४३९ ॥
परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणौनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥ ४४० ॥
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१॥

ऐकें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें । तें तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥ ४४१ ॥
मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ॥ ४४२ ॥
हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ? । ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥ ४४३ ॥
पाठीं जन्में संसारीं । परि सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥ ४४४ ॥
जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टीं ॥ ४४५ ॥
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासार विचारु । मंत्री जया ॥ ४४६॥
जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥ ४४७ ॥
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥ ४४८ ॥

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् । एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ४२॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३॥
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्यश्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥ ४४९ ॥
जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूजती कोकिल वनीं । संतोषाच्या ॥ ४५० ॥
जे विवेकद्रुमाचे मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥ ४५१ ॥
मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे । सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥ ४५२ ॥
तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥ ४५३ ॥
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें ॥ ४५४ ॥
ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥ ४५५ ॥
अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे ॥ ४५६ ॥

Very nice explanation, Arjun is representing us...got clarifications on lot of aspects
ReplyDelete