अध्याय १३ : ओव्या ९२७-९६८

 १३ सप्टेंबर २०२० निरुपण 

अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक १७-१९ / ज्ञानेश्वरी ओव्या ९२७-९६८  )


ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते । ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विस्ठितम् ॥ १७॥


जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणें ॥ ९२७ ॥
जयाचेनि उजियेडें । तारांगण उभडें । महातेज सुरवाडें । राहाटे जेणें ॥ ९२८ ॥
जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥ ९२९ ॥
जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥ ९३० ॥
जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण । क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥ ९३१ ॥
आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे । संहारु जेणें संहारे । पंडुकुमरा ॥ ९३२ ॥
जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणें तेजें ॥ ९३३ ॥
जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु । हें असो आघवाची आभासु । आभासे जेणें ॥ ९३४ ॥
किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा । जेथ नाहीं रिगावा । द्वैतभावासी ॥ ९३५ ॥
जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें । एकवाट कालवे । सामरस्यें ॥ ९३६ ॥
मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञानें गमिजे स्थान । तेंहि तेंची ॥ ९३७ ॥
जैसें सरलियां लेख । आंख होती एक । तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥ ९३८ ॥
अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची वही । हें असो जें हृदयीं । सर्वांच्या असे ॥ ९३९ ॥


इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः । मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८॥


एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा । दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥ ९४० ॥
तैसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी । तें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥ ९४१ ॥
अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें । जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे ॥ ९४२ ॥
आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें । निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥ ९४३ ॥
हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥ ९४४ ॥
देहादि परिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं । जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला ॥ ९४५ ॥
ते मातें किरीटी । हेंचि जाणौनियां शेवटीं । आपणपयां साटोवाटीं । मीचि होती ॥ ९४६ ॥
मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं । सोहोपी सर्वांपरी । रचिलीं आम्हीं ॥ ९४७ ॥
कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे । अथावीं सुइजे । तरी जैसी ॥ ९४८ ॥
एऱ्हवीं अवघेंचि आत्मा । हें सांगों जरी वीरोत्तमा । परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना ॥ ९४९ ॥
म्हणौनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें । जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे ॥ ९५० ॥
पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे । तैसें एकचि हेंचतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥ ९५१ ॥
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणौनि तुझें ॥ ९५२ ॥
आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता । नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों ॥ ९५३ ॥
आतां चौठायीं न करूं । एकही म्हणौनि न सरूं । आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु ॥ ९५४ ॥
परि तुवां येतुलें करावें । मागों तें आम्हां देआवें । जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा ॥ ९५५ ॥
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला । तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥ ९५६ ॥
ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुषविभागु । परिसें सांगों ॥ ९५७ ॥


प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि । विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९॥


जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥ ९५८ ॥
तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥ ९५९ ॥
तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति । संसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥ ९६० ॥
कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा ॥ ९६१ ॥
तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे । प्रकृतिपुरुष प्रगटें । अनादिसिद्धें ॥ ९६२ ॥
पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें । तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ॥ ९६३ ॥
आणि क्षेत्रज्ञ ऐसें । जयातें म्हणितलें असे । तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं ॥ ९६४ ॥
इयें आनानें नांवें । परी निरूप्य आन नोहे । हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती ॥ ९६५ ॥
तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता । प्रकृतीतें समस्तां । क्रिया नाम ॥ ९६६ ॥
बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक ॥ ९६७ ॥
हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥ ९६८ ॥

1 comment:

  1. रामकृष्ण हरी!
    खुपच छान निरुपण!

    ReplyDelete

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099