८ एप्रिल २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक १४-१५ / ज्ञानेश्वरी ओव्या १०९ ते १२४ )
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४॥
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥
जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥
देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ । समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५॥
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
सारांश : *भगवतगीता श्लोक 14/15 * *ज्ञानेश्वरी अध्याय 2 श्लोक 111-124*
आज आपण पाहिले की देहबुद्धीने वावरणाऱ्या आपल्या सारख्या सामान्य माणसाला मी म्हणजे देहचं आहे
असेच वाटते. त्यामुळे आपले संपुर्ण लक्ष आपल्या फक्त इंद्रियांमध्ये असते. इंद्रियांना होणारी विषयांची वासना हे सर्व आपल्या सूखदुःखाचे मुळ कारण होय. त्यामुळे विषयाच्या आधीन कधीही होऊ नये. विषय आणि इंद्रिये यांचा मोह आपल्या शुद्ध व निर्मल अंतःकरणाला सारखे corrupt करतअसतो. एकच विषय, वेगवेगळ्या परिस्थिती नुसार आपल्याला सुख किंवा दुःखकारक अनुभव देत असतो.(situation dependent experience).
उदा. Icecream / श्रीखंड gives pleasant feeling to us in summer while the same proves to be
harmful in winter. किंबहुना, एकच प्रसंग कधीकधी एकाला सूख व दुसऱ्याला दुःख निर्माण करतो.
ती प्रथम आपल्याला प्रिय वाटते. मग मनात ती मिळण्याचा मोद निर्माण करते. मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव
घेतला की ती प्रमोद अनुभव देते. पाचही ज्ञानेंद्रिये आपण पाहिले, तर हेच लक्षात येते की शब्द, स्पर्श, रस,
रूप आणि गंध आपल्याला कधी शीतलता तर कधी उष्णता प्रदान करतात. विषयापासून मिळणारे सुख हे
अशाश्वत, अनित्य असते त्यामुळे ते क्षणभंगुर असते व म्हणून त्याचा तू त्याग कारण ते सर्व मिथ्या आहे.
या श्लोकात असे सांगितले आहे की जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याला धीरगंभीरपणे सहन करत त्यांना सामोरे जा आणि जशी नदी आपल्या वाटेल आलेले सर्व अडथळे पार करत (overcome करत or
workaround काढत) आपला अंतिम ध्येयाचा प्रवास अखंड सुरू ठेवते तसा सारासार विचार करून देह
प्रारब्धावर सोडून विवेकाने पुढे चाला म्हणजे हा भवसागर तरून जाणे सोपे होईल आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग
मोकळा होईल.
(प्रारब्धाला कोसत बसण्यापेक्षा आपला पुरुषार्थ गाजव. प्रयत्नाने आणि कौशल्याने प्रसंगावर मात करण्याचा
प्रयत्न कर)
*Example (Vivek):* या देहरूपी प्रयोगशाळेमध्ये तू स्वतःच, स्वतःवरच, स्वतःच्याच प्रयत्नाने प्रयोग करून
आपल्या जीवनाचा उध्दार करून घे.
*मोक्ष*-
1. जन्म आणी मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणे.
*OR*
2. निरंतर समाधानाची स्थिती प्राप्त होणे जीथे आपण कुठल्याही परिस्थितीत आनंदी आणि सुखी राहतो.
मन/अंतःकरण इतके strong झाले की तेथे विषय आपल्या मनावर कधीच dominate करू शकत नाही. सुख
आणि दुःख या दोनीही प्रसंगांना आपण तितक्याच शांतपणे आणि संयमाने सामोरे जातो.
सदैव सत्कर्मे करून आपल्या पूर्वसंचिताचा bank balance सतत वाढविण्याचा प्रयत्न करावा. शेवटी ही
*F D* ( फिक्स deposit) automaticaly पुढे व्याजासाहित transfer होइल.
स्वामी स्वरूपानंदानी सांगितल्या प्रमाणे या जीवनातल्या प्रत्येक बरे वाईट कर्मांची ही फिल्म जशीच्या तशी
आपल्या सोबत घेऊन आत्मा पुढच्या (camera मध्ये load करतो) शरीरात प्रवेश करतो.
म्हणून, आपल्या पूर्वसंचितामुळे हा इतका दुर्लभ मनुष्य देह मिळाला आहे, त्याचा सदुपयोग करून
जास्तीतजास्त पुण्यसंचय करण्याचा प्रयत्न करावा.
*Example (Amit):* हा iphone7 सुरु आहे तोपर्यंत आपला profile enrich करून सत्कर्माचा साठा सतत cloud वर upload करत राहा म्हणजे तो पुढच्या जन्माच्या वेळेला (नवीन मोबाईल start करताना) retrieve करता येइल. अशी आपली जन्मोजन्मी उन्नती होत राहील.
खूप छान उदाहरणे देवून तुम्ही समजावून सांगितले आहे. खूप छान निरूपण. धन्यवाद.
ReplyDelete